- शार्ली हेब्दो च्या अनुशंगाने
म्हटलं तर घडवते
म्हटलं तर बिघडवते
लेखणी
कल्पना-विलासात रमणाऱ्यानो जागे व्हा।।
प्रेषितं घडवले त्या लेखण्यांनी कुणा अवलियाच्या
जे लिहून गेले कथा रामायण महाभारताच्या
ज्यांनी लिहिल्या संहिता कुराण -बायबलाच्या
सत्य तेवढयाच त्या दंतकथा गतकाळाच्या
कुणासाठी स्फुरण तर कुणासाठी मरण
म्हणून म्हणतॊ,
कल्पना-विलासात रमणाऱ्यानो जागे व्हा।
धर्म प्रचारासाठी पुढे व्हा
जीवन जगण्यासाठी जरूर तो धर्म
जीवन जगण्याचा मार्ग तो धर्म
पुस्तकी नाही तो धर्म
सर्वांचा वेगळा तो वैयक्तिक धर्म
]
No comments:
Post a Comment